Shoponix
Shoponix
Home
Women
Clothing
Gifts
Hair and Skin care
Home Furnishing
Jewelry
Kids
Gifts
Kids Accessories
Home and Living
Clothing
Food
Gifts
Home Decor
Home Furnishing
Services
My Profile
☰
Author Name:Shilpa H.
Tripurari Pornima
How to celebrate
या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानात जे दीपस्तंभ (उंच दगडी दिवे) असतात ते सुद्धा पेटवितात. या दिपोत्सवालाच त्रिपुर पाजळणे असे म्हणतात.
कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असे म्हणतात.
या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे, गंगास्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे. दुष्टांचा संहार या दिवशी झाल्याने हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात. देवस्थानातील दगडी दीपमाळाही या दिवशी पाजळतात व नदीच्या पात्रात प्रज्वलित दीप सोडतात. त्रिपुरांतक रूपातील शिवाची सुंदर शिल्पे भारतात अनेक ठिकाणी आहेत. ‘त्रिपुरज्वलनव्रत’ या नावाचे एक व्रत या दिवशी करतात. शिवापुढे वाती लावणे, दीपपात्रे दान देणे, शिवाची पूजा करणे हा या व्रताचा विधी असतो.
Story behind it
तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण शेवटी असुर ते असुरच त्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्रीशंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरु झाली
जे जे चांगले ते ते रुजवावे,..
वाईट तेवढे काढूनी टाकावे..
हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.
त्रिपुरी पौर्णिमे दिवशीचा माझा आत्ताचा ( recent) फोटो येथे शेअर करत आहे.
🙏🙏😊धन्यवाद 😊🙏🙏