Shoponix
Shoponix
Home
Women
Clothing
Gifts
Hair and Skin care
Home Furnishing
Jewelry
Kids
Gifts
Kids Accessories
Home and Living
Clothing
Food
Gifts
Home Decor
Home Furnishing
Services
My Profile
☰
Author Name:Rajashree Shah
Raksha Bandhan (Rakhi Poornima)
How to celebrate
रक्षाबंधन हा बहिणींचा सण म्हणून ओळखला जातो बहिण भावाला राखी बांधते हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी भावाला आवडेल असेच जेवण मी बनवते . त्याला बासुंदी खुप आवडते. मग पोळी, बटाटा ची भाजी, ढोकळा, भजी, पापड, गोड मध्ये बासुंदी असे सगळे बनवते. ❣️❣️ मग छान नटून थटून पूजेचे ताट तयार करते. मी त्याला रेशीम धाग्याची राखी बांधते.? मग तो ओवाळणी म्हणुन छानसे गिफ्ट देतो.
Story behind it
😍 राखीचा खूपच जुना इतिहास आहे श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते त्यावेळी पांडवांची पत्नी द्रौपदी ने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या पोटाला बांधली आणि त्याचा रक्तस्त्राव थांबवला तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला आणि आज श्रीकृष्णाने द्रोपती चा भाऊ म्हणून त्याचे रक्षण केले राखी बांधतात यामागचे शास्त्र आहे आणि त्यापैकी एक शास्त्र असे आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी या लहरींचे प्रमाण अधिक असते या पुरुषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात त्यामुळे या यमलहरी देहात सुरू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो पण त्याच वेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम करतात असे मानले जाते त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करतात असे शास्त्र सांगते म्हणून राखी पौर्णिमेचा सण हा साजरा केला जातो . 😍
🙏 याचेच जिवंत उदाहरण म्हणजे कारोना काळात माझ्या भावाने माझी खूप सेवा करून मला एकदम छान बरे केले . मला जेव्हा कोरोना झाला तेव्हा मी खूप घाबरले होते नंतर चौदा दिवस मला quarantine राहायचे होते पण जायचे कुठे हा मोठा प्रश्न होता पण माझ्या भावाने लगेच मला फोन करून सांगितले की तू चौदा दिवस माझ्याजवळच राहायचे त्याने माझी सोयस्वतःच्या बंगल्यात केली आणि खरच त्याने चौदा दिवस माझी खूप सेवा केली आणि मला त्यातून बरे केले.🙏
🧍 राखी पौर्णिमा म्हणजे नुसते राखी बांधणे नाही तर राखी चे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहिण-भावाचे. नुसता धागा नाही त्यात भावड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात. हाचभाऊ मला जन्मोजन्मी मिळावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. 🙏🙏 भावा बहिणीचे प्रेम म्हणजे एक अतूट न तुटणारे नाते आहे. कोणत्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भावा बहिणीचे नाते एवढे गोड आहे.❣️❣️
तुझी आठवण येता मन भरून येते रे
तुला पाहण्याची आस माझ्या मनात तेवते.
नाते बहिण-भावाचे आहे अति व प्रेमाचे.
मोगऱ्याच्या गंधा सम नित्य मनी जपा याचे
तुझं लाभो यशकिर्ती हेच मागणे मागते.
आजच्या या शुभदिनी गणेशास विनवते.🙏